शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एमटीडीसी तोट्यात असूनही नवीन संचालक नेमून प्रशासकीय खर्च वाढविण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:53 IST

मागील तीन वर्षे थोडा का असेना पण नफा कमवणाऱ्या एमटीडीसीला या वर्षासह येत्या तीन वर्षांत तब्बल ३५ ते ४० कोटींचा तोटा होईल.

- अतुल कुलकर्णी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात एकही पर्यटक एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये फिरकला नाही. जे येणार त्यांनीही बुकिंग रद्द केल्याने पैसे परत देण्याची वेळ आली. त्यामुळे मागील तीन वर्षे थोडा का असेना पण नफा कमवणाऱ्या एमटीडीसीला या वर्षासह येत्या तीन वर्षांत तब्बल ३५ ते ४० कोटींचा तोटा होईल. लॉकडाऊनमध्ये एमटीडीसीचे ३ महिन्यांत ९ कोटींचे नुकसान झाले.या वस्तुस्थितीची जाणीव विभागाने नुकतीच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करून दिली आहे. येथे काम करणाºया ७५५ स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटकांनी राहायचे त्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर ८६, पानशेत ३५, भीमाशंकर ८१, वेळणेश्वर १५, तारकर्ली २० आणि नागपूर २२ असे तब्बल २५९ कक्ष डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी व संशयित रुग्णांसाठी वापरायला दिले गेले. त्यापोटी एमटीडीसीला शासनाचे ३८६.५१ लाख रुपये येणे बाकी आहे.ही परिस्थिती असताना २०१६ साली घेतलेला एक निर्णय २०२० मध्ये अमलात आणून प्रशासकीय खर्च वाढवण्याचा घाट आहे. २०१६ साली एमटीडीसीमध्ये संचालक पर्यटन हे पद तयार केले होते. पर्यटन विभागाला सचिव आणि एमटीडीसीला एमडी (व्यवस्थापकीय संचालक) ही दोन पदे असताना संचालकांचे पद या दोन पदांमध्ये निर्माण करून एमडीची काही कामे त्यांच्याकडे सोपवली जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना नव्याने संचालकपद तयार करून त्यांना कर्मचारी द्यायची गरज काय, असा सवाल आता विभागातील अधिकारीच करत आहेत. मात्र, एका अतिवरिष्ठ अधिकाºयाच्या हट्टापायी हे केले जात असल्याची चर्चा आहे.