शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचा ‘बाजार’

By admin | Updated: June 8, 2015 01:51 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) बनावट प्रश्नपत्रिका १५ लाखांत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेतून रविवारी पहाटे गजाआड केले.

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) बनावट प्रश्नपत्रिका १५ लाखांत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेतून रविवारी पहाटे गजाआड केले. याच बंगल्यात प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली. प्रतापसिंग काकरवाल हा या टोळीचा म्होरक्या असून, मिर्झा मोहसीन अहेमद , रोहित गिरी , नीलेश वाघ , गणेश मैद , रामेश्वर पवार , भोलेशंकर साबळे आणि परीक्षार्थी अर्जुन बमनावत, कृष्णा मारक , ओमनाथ ऊर्फ किशोर राठोड , संदीप मातेरे , संदीप शिंदे , भानुदास बोर्डे , दत्तात्रय गोराडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काकरवाल याच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपवरून बनावट प्रश्नपत्रिका पाठविणारा श्रीनिवास बनसोडे मात्र, फरार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ७ जून रोजी विक्रीकर निरीक्षक पदाकरिता स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती़ या परीक्षेची प्रश्नपत्रिका काही परीक्षार्थींना पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस दोन दिवसांपासून टोळीच्या मागावर होते. शनिवारी रात्री साडेदहा वाजता सुरू झालेली शोधमोहीम रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सिडको एन-४ मधील समृद्धीनगरातील एका घरावर येऊन थांबली. या घराच्या प्रवेशद्वारावर दोन बाऊंन्सर, तर घरात अन्य १२ जण होते. यातील सहा जण प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करीत होते. या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकी पंधरा लाखांत सौैदाकाकरवाल याने परीक्षार्थीना फसविण्याच्या उद्देशानेच त्यांना लोकसेवा आयोगाची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे खोटे सागितले. त्याकरिता त्याने काही एजंटही नेमले होते. एजंटमार्फत ७ जून रोजी कर सहायक परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा त्याने शोध घेतला. यात आठ उमेदवार त्याच्या गळाला लागले. फरारी बनसोडे याने काकरवालच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका संच पाठविला. याच्या बदल्यात प्रत्येक उमेदवारासोबत बारा ते पंधरा लाख रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला गोपनीय अहवालएमपीएससीची ही परीक्षा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान होती. पण सकाळी सात वाजता पोलिसांनी प्रश्नपत्रिकेच्या सत्यतेबाबत खात्री करण्याकरिता जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्याकडे गोपनीय अहवाल पाठविला. पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली. आयोगाकडून प्राप्त झालेल्या विविध प्रश्नपत्रिकांचा संच आणि जप्त केलेली प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. त्यात जप्त केलेला संच पूर्णत: वेगळा असल्याचे समोर आले.