शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 11:57 IST

निवडणुक आयोगाने प्रत्यक्ष गोष्टीसाठी, कोणत्या वस्तूसाठी किती रुपये खर्च येणार याची अगदी वडापावपासून ते गाड्यांपर्यंतची यादी तयार केली आहे़ असे असले तरी प्रत्येक उमेदवार त्यातून पळवाटा काढत असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे

ठळक मुद्दे७० लाखांची खर्च मर्यादा पाळताना धावपळ कागदोपत्री खर्च दाखवताना काढली जाते पळवाट?

- विवेक भुसेपुणे : निवडणुकीचा खर्च वाढल्याचे सगळेच म्हणतात़ लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी निवडणुक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. प्रत्यक्षात मात्र निवडून आलेल्या खासदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या मर्यादेच्या तुलनेत फक्त ५८ टक्के खर्च केल्याचे विवरण निवडणूक आयोगाला सादर केले होते़ त्यामुळे कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यात तफावत असावी काय, अशी शंका यातून पुढे आली आहे.  अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये पाण्यासारखा पैसे खर्च केला जातो़, असे सांगितले जाते. कागदावर मात्र हा खर्च कुठेच दिसत नसल्याचे स्पष्ट होते. निवडणुक आयोगाने प्रत्यक्ष गोष्टीसाठी, कोणत्या वस्तूसाठी किती रुपये खर्च येणार याची अगदी वडापावापासून ते गाड्यांपर्यंतची यादी तयार केली आहे़ असे असले तरी प्रत्येक उमेदवार त्यातून पळवाटा काढत असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार सौम्या गुप्ता यांनी तर सर्वांवर कडी करणारा खर्च सादर केला होता़ त्यांनी केवळ ३९ हजार ३६९ रुपये खर्च केल्याचे दाखविले़ केवळ ३९ हजार रुपयांमध्ये निवडून आल्याचा हा एक विक्रमच असावा़निवडून आलेल्या खासदारांनी दिलेल्या खर्चाच्या विवरणावरुन आसाममधील गौरव गोगोई यांनी सर्वाधिक ८२ लाख ४० हजार रुपये खर्च केल्याचे दाखविले होते़ त्यांच्याकडून ७० लाख रुपयांची मर्यादा ओलांडली गेली होती़ नॅशनल इलेक्शन वॉचने केलेल्या अभ्यासात ही माहिती पुढे आली आहे़  मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मागच्या निवडणुकीला ५ कोटी रुपये खर्च आल्याचे सांगत त्यात आता किती वाढ होईल, हे सांगता येत नसल्याचे विधान करुन खळबळ उडवून दिली होती. दिवसा ढवळ्या वाटेलतसा खर्च होऊ लागला आहे़ हा खर्च कागदावर येणार नाही याची काळजी घेतली जात आहे़ निवडणुक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चची मुभा दिला असताना त्याहून कितीतरी पटीने खर्च होत असला तरी तो दाखविला जात नाही़ उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या मिरवणुकीसाठी जमलेला समुदाय पाहिल्यावर त्यावरच काही लाख रुपये नक्की खर्च झाल्याचे दिसून येते़ पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांच्या सभांसाठी कोटी रुपयांपर्यंत खर्च होत असतात़ या जाहीर सभांसाठी खुर्च्याच ३० ते ४० हजारांवर लावलेल्या असतात़ असे असताना हा खर्च केवळ काही लाख रुपये दाखविला जातो़ 

लोकसभेच्या ५३७ खासदारांनी निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चाच्या विवरणाचा अभ्यास केल्यावर १७६ खासदारांनी मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी खर्च दाखविला होता़* या खासदारांनी सरासरी केवळ ४० लाख ३३ हजार रुपये खर्च दाखविला़ तो खर्च मर्यादेच्या केवळ ५८ टक्के इतका आहे़ * मेघालयातील खासदारांनी सर्वाधिक सरासरी ५७ लाख ८९ हजार रुपये खर्च दाखविला़ त्याखालोखाल केरळ ५२ लाख ९ हजार रुपये त्यांच्या पाठोपाठ सिक्कीमच्या खासदारांनी ५१ लाख ३० हजार रुपये खर्च दाखविला आहे़ * मोठ्या राज्यात राजस्थानमधील खासदार खर्च दाखविण्यात सर्वात पुढे होते़ त्यांनी सरासरी ४७ लाख ८९ हजार रुपये खर्च दाखविला़* महाराष्ट्रातील खासदारांनी सरासरी ४६ लाख ९३ हजार रुपये खर्च दाखविला़ * मोठ्या राज्यात आंध्र प्रदेशातील खासदारांनी सरासरी केवळ २९ लाख १९ हजार रुपये खर्च दाखविला आहे़ ़़़़़़़़़़़़प्रमुख नेत्यांनी केलेला २०१४ मधील निवडणुक खर्चनरेंद्र मोदी               - बडोदा                                       ५० लाख ३ हजार ५९८नरेंद्र मोदी             - वाराणसी                                      ३७ लाख ६२ हजार ३५१नितीन गडकरी      - नागपूर                                     ४० लाख २६ हजार ७९राहुल गांधी             - अमेठी                                               ३९ लाख ११ हजार १२३सोनिया गांधी          - रायबरेली                              ३० लाख ६० हजार १२०राजनाथ सिंह            लखनौ                                     १७ लाख ७६ हजार ९५२हेमा मालिनी     -   मथुरा                                         ६३ लाख ३५ हजार २८०अशोक चव्हाण    -    नांदेड                                      ५५ लाख ४४ हजार ८३१राजू शेट्टी                      - हातकंणगले                     ५२ लाख ३८ हजार ३०१विजयसिंह मोहिते पाटील   -  माढा                         ५० लाख ८७ हजार १७७उदयनराजे भोसले             - सातारा                         ४६ लाख ८० हजार ६०१

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना