सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:41 PM2019-05-09T12:41:23+5:302019-05-09T12:43:38+5:30

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश

Mortgage order seizure of four factories in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर: जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिले आहेत. दरम्यान, ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्याचा साखर हंगाम संपला असून सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखाने फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान बंद झाले आहेत. थकबाकीदार साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची आरआरसीनुसार साखर जप्ती करून शेतकºयांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी काढले. यामध्ये संत कूर्मदास साखर कारखान्याकडे १२ कोटी २२ लाख ६९ हजार, बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरीकडे १९ कोटी ६० लाख ४३ हजार, विठ्ठल रिफायनरीज पांडे (करमाळा) या कारखान्याकडे २६ कोटी ७१ लाख ३१ हजार तर जयहिंद शुगरकडे १६ कोटी २४ लाख ४० हजार रुपये, याप्रमाणे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये शेतकºयांची देणेबाकी आहे. 

जानेवारीमध्ये साखर आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीनंतर ३१ जानेवारीला काढलेल्या आरआरसीच्या कारवाईमध्ये जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांचा समावेश होता. ही कारवाई तहसील कार्यालयाकडून थांबली असतानाच  साखर कारखान्यांनी शेतकºयांचे काही पैसे दिले आहेत. जे कारखाने सुनावणीच्या दिवशी थकबाकीत आहेत अशाच कारखान्यांवर पुन्हा आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून  सांगण्यात आले.

 फेब्रुवारी-मार्च महिन्यात गाळप बंद झाल्यानंतर आतापर्यंत शेतकºयांना उसाचे पैसे देणे बंधनकारक होते; मात्र ३० एप्रिलच्या माहितीनुसार जिल्ह्यातील गोकुळ माऊली या एकमेव साखर कारखान्याने एफआरपीनुसार  संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. अन्य ३० साखर कारखान्यांनी अद्यापही ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे दिले नसल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

‘विठ्ठलराव शिंदे’कडे सर्वाधिक थकबाकी
- ३० एप्रिलअखेर विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे ७४ कोटी ४० लाख,विठ्ठल गुरसाळे कारखान्याकडे ७२ कोटी १८ लाख, लोकनेते अनगरकडे ५८ कोटी ५७ लाख,गोकुळकडे ५३ कोटी १५ लाख, विठ्ठल रिफायनरीज पांडेकडे ५३ कोटी ८३ लाख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याकडे ५४ कोटी ७ लाख, सिद्धेश्वर कारखान्याकडे ४९ कोटी २३ लाख,  लोकमंगल शुगरकडे ४६ कोटी ६८ लाख, बबनराव शिंदे तुर्कपिंपरीकडे ४४ कोटी १५ लाख,  पांडुरंगकडे ४२ कोटी २१ लाख, जकरायाकडे ३८ कोटी ७० लाख, जयहिंदकडे ३७ कोटी २३ लाख, सिद्धनाथ शुगर ३४ कोटी ६९ लाख.

जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याच्या सूचना आमच्या विशेष लेखापरीक्षकांना दिल्या आहेत. ही माहिती दिल्यानंतर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे महसूल खात्याला सोयीचे होणार आहे.
-अविनाश देशमुख,
साखर सहसंचालक, सोलापूर 

च्मातोश्री लक्ष्मी शुगरकडे ३२ कोटी ५२ लाख, भैरवनाथ आलेगावकडे ३० कोटी ६९ लाख, युटोपियनकडे २७ कोटी ८० लाख, सासवड माळीशुगरकडे २७ कोटी २१ लाख, भीमा टाकळी सिकंदरकडे २६ कोटी ८९ लाख, श्री मकाईकडे २२ कोटी १० लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळकडे १७ कोटी ९५ लाख,  भैरवनाथ विहाळकडे १६ कोटी ५३ लाख, फॅबटेककडे १५ कोटी ५५ लाख, आदिनाथकडे १४ कोटी ७१ लाख, भैरवनाथ लवंगीकडे १४ कोटी ४४ लाख,सहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटी ५३ लाख, कूर्मदासकडे १२ कोटी २३ लाख,  संत दामाजी कारखान्याकडे १० कोटी ८० लाख, सीताराम महाराजकडे १० कोटी ५७ लाख, इंद्रेश्वरकडे ७ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे थकबाकी असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाने सांगितले. 

Web Title: Mortgage order seizure of four factories in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.