शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

शिक्षकाच्या हत्येत दोनपेक्षा जास्त आरोपी, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 23:17 IST

 सावंतवाडी - गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. गुरव यांना भडगाव येथून कावळेसादला एकट्याने आणणे शक्य नाही. आरोपीला कोणीतरी मदत केली असावी तसेच गुन्ह्यात दोन कारचा वापर केला असावा, असा अंदाजही गुरव यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.शिक्षक गुरव यांच्या भडगाव ...

 सावंतवाडी - गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. गुरव यांना भडगाव येथून कावळेसादला एकट्याने आणणे शक्य नाही. आरोपीला कोणीतरी मदत केली असावी तसेच गुन्ह्यात दोन कारचा वापर केला असावा, असा अंदाजही गुरव यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.शिक्षक गुरव यांच्या भडगाव येथील नातेवाईक व ग्रामस्थांनी मंगळवारी सावंतवाडीत येऊन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची भेट घेतली. हा तपास गडहिंग्लज पोलिसांकडे वर्ग केला जाऊ नये. तसेच तिसºया आरोपीबाबत माहिती घेण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार खमलेट्टी, बसवराज मुत्नाळे, राजशेखर कित्तूरकर, बसवराज हिरेमठ, शशिकांत चोथे, गजानन गुरव, मलगोंडा पाटील, सुनील गुरव, शंकर गुरव, शामराव गुरव, चंद्रशेखर गुरव, मुकुंद गुरव, शिवानंद मठपती, पोलीस पाटील उदय पुजारी आदी उपस्थित होते.यावेळी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक धनावडे यांचे तपासाबाबत आभार मानले. ‘तुम्हीच माझे भाऊ’ असे म्हणत तपास तुम्हीच करा, गडहिंग्लज पोलिसांना देऊ नका, अशी विनंती केली. रक्ताच्या एका थेंंबावरून माझ्या भावाचा मृतदेह शोधून दिला, याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घ्या. कारण हत्येनंतर मृतदेह एकटा माणूस घरातून आंबोली कावळेसादपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्याला कोणीतरी मदत केली असावी. त्याचा शोध घ्या. तसेच या घटनेत दोन कार वापरल्या असाव्यात, असा संशयही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.आरोपी पत्नी जयलक्ष्मी घरातून बेपत्ता होताना ती मोठ्या प्रमाणात दागिने घेऊन गेली आहे. हे दागिने शोधून काढा आणि कोणत्यातरी अनाथालयाला दान द्या, असेही शिक्षक गुरव यांची बहीण सरला गुरव यांनी पोलिसांना सांगितले. तर भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांनीही या गुन्ह्यात आणखी कोणाचातरी सहभाग आहे. एकटा सुरेश चोथे हे करूच शकत नाही. तसेच ज्या कारमधून मृतदेह घेऊन गेले ती कार नादुरूस्त होती. तरीही त्या कारमधून मृतदेह कसा काय घेऊन जाऊ शकतो? आणखी कोणत्यातरी वाहनाचा यात समावेश आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.           आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगीआरोपी सुरेश चोथे व जयलक्ष्मी गुरव यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही गेल्या आठवड्याभरात काय तपास केला याची माहिती न्यायालयाला दिली आहे. बेपत्तानंतर गुरव यांच्या शोधासाठी आरोपी पुढेशिक्षक गुरव हे घरातून बेपत्ता झाल्यानंतर गावात शोधाशोध सुरू झाली, तसा मी त्यातला नाही असे म्हणत आरोपी सुरेश चोथे हा सगळ््यात पुढे होता. तो गावकºयांना मार्गदर्शन करीत होता. कोल्हापूरला गेले असतील, विहिरीत बघूया, डोंगरात जाऊया असे सांगून ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची सतत दिशाभूल करीत होता. दागिने चोरीचा तपास गडहिंग्लज पोलिसांनी करावाशिक्षक गुरव यांच्या हत्येचा गुन्हा सावंतवाडीत नोंद आहे. त्याचा तपास फक्त सावंतवाडी पोलीस करणार आहेत. मात्र दागिने चोरीचा गुन्हा गडहिंग्लज पोलिसांकडे आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गडहिंग्लज पोलिसांनी करावा. त्यात आमचा कोणताही सहभाग असणार नाही, असे मत पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी व्यक्त केले.सावंतवाडी बार असोसिएशनला आवाहनशिक्षक गुरव यांच्या कुटुंंबीयांनी तसेच नातेवाईकांनी मंगळवारी सावंतवाडीत येऊन बार असोसिएशनला निवेदन सादर केले. यात आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, अशी विनंती बार असोसिएशनला केली आहे. यावर बार असोसिएशनही सकारात्मक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग