शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

राज्यात ५० लाखाहून अधिक डिजिटल सातबारा उतारे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 20:18 IST

गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाची यंत्रणा पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या कामात व्यस्त असल्याने डिजिटल सातबारा उता-याच्या कामावर परिणाम झाला आहे. 

ठळक मुद्देमहसूल विभागाच्या अधिका-यांवर इतर कामांची जबाबदारी आल्याने डिजिटल सातबारा उता-याचे काम रखडले दररोज १५ ते २० हजार डिजिटल सातबारा उतारे तयार केले जात होते.मात्र,ही संख्या आता ३ ते ४ हजारावरडिजिटल सातबारा उता-याची माहिती लवकरच क्लाऊडवर येणार

पुणे: महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला असून आत्तापर्यंत ५० लाख ८५ हजार २९७ डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही १ कोटी ५७ लाख ३ हजार २३३ उतारे डिजिटल स्वरुपात तयार करण्याचे काम शिल्लक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाची यंत्रणा पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या कामात व्यस्त असल्याने डिजिटल सातबारा उता-याच्या कामावर परिणाम झाला आहे. सातबारा उतारे मिळण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना होणारा तलाठी कार्यालयाकडून त्रास कमी करण्यासाठी ई -फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिटल  सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठी कार्यालयात सातबारा उता-यामधील दुरूस्तीसाठी गाव पातळीवर उता-यांचे चावडी वाचन केले गेले. तसेच सक्षम अधिका-याकडे अर्ज करून उता-यातील दुरूस्तीसाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, तरीही अनेक शेतक-यांच्या सातबारा उता-यात काही तृटी दिसून येत होत्या. त्यामुळे महसूल विभागातर्फे दुरूस्तीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे २०१८ रोजी नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.मात्र, अद्याप सर्व जिल्ह्यातील डिजिटल सातबारा उता-यांचे काम पूर्ण झालेले नाही.महसूल विभागाच्या अधिका-यांवर इतर कामांची जबाबदारी आल्याने डिजिटल सातबारा उता-याचे काम रखडले आहे. दररोज १५ ते २० हजार डिजिटल सातबारा उतारे तयार केले जात होते.मात्र,ही संख्या आता ३ ते ४ हजारावर आली आहे.डिजिटल सातबारा उता-याची माहिती लवकरच क्लाऊडवर येणार आहे.त्यामुळे या कामास गती मिळेल,अशी शक्यता आहे.---------------डिजिटल सातबारा उता-याची आकडेवारी अकोला-२,९४,००० ,अमरावती-२,७३,११३, अहमदनगर-५,५०,४७९, उस्मानाबाद-२,७८,३१९, औरंगाबाद-३७,७२६,कोल्हापूर-१,९८,६०३,गडचिरोली-१,३७,४६७,गोंदिया-८२,१४२, चंद्रपूर-१,३७,४९६,जळगाव-४९,६४२,जालना-१,८३,५४९,ठाणे-५२,७५०, धुळे -४,०६३,नंदुरबार-३८,८१७,नांदेड-२६६,नागपूर-२,७३,२४९,नाशिक-२,३४,२३५,परभणी-५८,९०२,पालघर-३,१९६, पुणे-२,१७,२५३,बीड-२,००,४१२,बुलढाणा-२,५७,२७७,भंडारा-२,३३,४८५,यवतमाळ-२,८७,२३२,रायगड-२,८५,४६४,लातूर-८९,७९९,वर्धा-१,२०,९९३,वाशिम-१,३४,०३४,सांगली-२४,६०१,सातारा-२४,६५७, सोलापूर-२,१५,०१४, हिंगोली-१,०६,९९९,

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलFarmerशेतकरीGovernmentसरकार