मॉन्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर पाच जूनला आगमन होणार ; वेधशाळेने वर्तवला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 16:02 IST2020-05-15T15:45:21+5:302020-05-15T16:02:32+5:30
मागील वषीच्या तुलनेत यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर येण्यास नैॠत्य मॉन्सूनला थोडा विलंब

मॉन्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर पाच जूनला आगमन होणार ; वेधशाळेने वर्तवला अंदाज
पुणे : कोरोनाच्या संकटाने संपूर्ण महाराष्ट्र चिंताग्रस्त असताना दुसऱ्या बाजुला यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यावर्षी नैॠत्य मॉन्सुनला सुरुवात पाच जूनपासून होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जुन या दिवशी केरळच्या किनारपट्टीवर मॉन्सुनचे आगमन होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर येण्यास नैॠत्य मॉन्सूनला मागील वषीच्या तुलनेत थोडा विलंब झाला आहे. यावेळी तो पाच जुनच्या वेळी दाखल होण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमन कालावधीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती निर्माण होणार आहे. साधारण दीर्घकालीन वेळेनुसार मॉन्सून 20 मे पर्यंत अंदमान - निकोबार बेटांवर दाखल होऊन बहुतांशी भाग व्यापतो. मागील वर्षी 18 मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपूर्ण अंदमान बेटे व्यापण्यास 30 मे पर्यंत वाट पाहावी लागली होती. तसेच यावर्षी नैॠत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सुन) हंगामात जुन ते सप्टेंबर या कालावधीत यंदा शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज विभागाने यापूर्वी जाहीर केला आहे. त्यात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.