Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:24 IST2025-05-21T09:21:58+5:302025-05-21T09:24:29+5:30
Monsoon Update : या वर्षी मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
Monsoon Update : प्रत्येक वर्षी शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. पेरणीसाठी शेती तयार करुन ठेवली जाते. दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतो. पण, या वर्षी मान्सून राज्यात लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या वर्षी २५ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने ही शक्यता व्यक्त केली आहे. केरळमध्ये मान्सून येण्याची नेहमीची तारीख १ जून असते. यापूर्वी हवामान विभागाने २७ तारखेपर्यंत मान्सून केरळ किनाऱ्यावर पोहोचू शकेल असा अंदाज वर्तवला होता.
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
हवामान कसे असेल?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४-५ दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. पुढील ३ दिवसांत ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडाटी वादळे आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० ते २६ मे दरम्यान पश्चिम किनारपट्टी (कर्नाटक, कोकण आणि गोवा आणि केरळ) आणि द्वीपकल्पीय भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मंगळवारी (२० मे) रोजी हवामान विभागाने म्हटले की, हिमाचल प्रदेशात २३ आणि २४ मे रोजी आणि उत्तराखंडमध्ये २१ ते २६ मे दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. २० ते २६ मे दरम्यान पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे पडण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ मे रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
महाराष्ट्रातही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि महाराष्ट्रात मान्सून ६ जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.