शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनची वाटचाल रखडली; कोकणात पावसाचा जोर कायम तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 18:45 IST

राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता..

ठळक मुद्देराज्यात येत्या आठवड्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी

पुणे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून राज्यात येत्या आठवड्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. उत्तर भारतात वाटचाल करण्यासाठी अनुकुल वातावरण नसल्याने मॉन्सूनची प्रगती गेल्या ५ दिवसांपासून रखडली आहे. मॉन्सून सध्या मध्य प्रदेशापर्यंत पोहचला आहे.

गेल्या २४ तासात गुहागर १५०, काणकोण, मोखेडा ४०, दोडामार्ग, कुडाळ, माथेरान, पेडणे, केपे, रत्नागिरी, सावंतवाडी, वैभववाडी, वालपोई, वेंगुर्ला ३०मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय काही ठिकाणी हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ५०, राधानगरी ४०, पन्हाळा, शाहूवाडी ३०, आजरा, चांदगड, सांगली २० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील अंबेजोगाई ६०, औरंगाबाद, मंथा ५०, हदगाव ४०, कळमनुरी, सेलू ३०, घनसावंगी, हिमायतनगर, हिंगोली, सेनगाव २०, औंधा नागनाथ, ,माजलगाव, परतूर १० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भात धारणी ५०, खारंघा ३०, आष्टी, चिखलदरा, काटोल, नारखेडा, वरुड २०, आर्वी बाभुळगाव, चांदूर, धामणगाव, मोर्शी १० मिमी पाऊस झाला होता. घाटमाथ्यावरील वळवण ३० मिमी पाऊस झाला असून अन्य ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली होती. 

इशारा : २१ जून रोजी कोकण,गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. २२ व २३ जून रोजी कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. .........राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ते २३ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २२ व २३ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२१ जून रोजी नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २१ जून रोजी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसMarathwadaमराठवाडाgoaगोवा