मान्सून परतला

By Admin | Updated: October 15, 2016 03:59 IST2016-10-15T03:59:26+5:302016-10-15T03:59:26+5:30

मुंबईसह राज्याला चार महिने झोडपून काढलेला मान्सून आजअखेर महाराष्ट्रातून परतला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून राज्यातून शुक्रवारी परतल्याची घोषणा

Monsoon is back | मान्सून परतला

मान्सून परतला

मुंबई : मुंबईसह राज्याला चार महिने झोडपून काढलेला मान्सून आजअखेर महाराष्ट्रातून परतला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून राज्यातून शुक्रवारी परतल्याची घोषणा केली आहे. आणि पुढील ४८ तासांसाठी मान्सून पूर्व आणि मध्य भारतातूनही माघार घेईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मौसमी पाऊस पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर अरबी समुद्राचा उर्वरित भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणचा (मुंबईसह) काही भाग, मध्य अरबी समुद्राच्या उत्तरीय भागातून परतला आहे.
मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली असली तरी मागील २४ तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Monsoon is back