शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सुखद वार्ता : केरळ येथे मॉन्सूनचे आगमन १० जूनपर्यंत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 12:39 PM

राज्यात मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे़.

ठळक मुद्देसध्या केरळ, तामिळनाडु, कर्नाटकात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस संपूर्ण मराठवाड्यात, कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ येत्या २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : हवामान विभागाने केरळ येथे मॉन्सूनचे आगमन येत्या ६ जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता़. त्यादृष्टीने अनुकुल वातावरण असले तरी केरळला मॉन्सून धडकण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे़. येत्या २४ तासात मॉन्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव कोमोरिन परिसर, मध्य बंगालचा उपसागरात दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकुल हवामान आहे़. राज्यात मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे़. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नागपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. सध्या केरळ, तामिळनाडु, कर्नाटकात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत आहे़. मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात सोलापूर ३०, उमरगा ४२, गंगाखेड २५, अहमदपूर, देवणी, पालन, उदगीर १६, औसा, जळकोट, लोहारा, परांडा, पूर्णा १०, बल्लापूर ३०, जोईती २०, चंद्रपूर कोरपना, राजूरा १० मिमी पावसाची नोंद झाली होती़. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून संपूर्ण मराठवाड्यात, कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्रात काही भागात किंचित वाढ झाली आहे़. येत्या २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. ६ व ७ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ८ जून रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़.

इशारा : ५ जून रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे़. ६ ते ८ जून दरम्यान विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसTemperatureतापमान