मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये

By Admin | Updated: January 31, 2015 04:58 IST2015-01-31T04:58:48+5:302015-01-31T04:58:48+5:30

नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदास लायक असल्याचे मत देशात सर्वप्रथम मीच व्यक्त केले होते. मात्र मोदींनी देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे

Modi should not be the Prime Minister of Gujarat | मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये

मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये

मुंबई : नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदास लायक असल्याचे मत देशात सर्वप्रथम मीच व्यक्त केले होते. मात्र मोदींनी देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे गुजरातचे पंतप्रधान होऊ नये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसैनिकांत जशी रग होती तशी ती मनसैनिकांत आपल्याला दिसायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मनसेच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच राज यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मोदी यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व काय, असा सवाल यावर आपल्याला भाजपाकडून केला जाऊ शकतो. मात्र त्यावर आपले उत्तर हेच आहे की, मुंगी माणसाला चावू शकते पण माणसाची कितीही इच्छा झाली तरी माणूस मुंगीला चावू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करणारच, असे संकेत राज यांनी दिले. वादळ कसे निर्माण करायचे ते आपल्याला चांगले ठाऊक असून ते आपण निर्माण करणार, असे सांगताना प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते. मागील निवडणुकीने विजयाची शिकवण दिली तर या वेळच्या निवडणुकीने पराभवाची शिकवण दिली, असे ते म्हणाले. मनसे सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी आपल्याला काही बोलायचे नाही, असे सांगताना मीडियाने आपल्या पक्षाची फार चिंता करू नये, असा टोलाही लगावला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Modi should not be the Prime Minister of Gujarat