गुंगीचे औषध देऊन 20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा मोकाट
By Admin | Updated: July 11, 2017 22:22 IST2017-07-11T22:22:19+5:302017-07-11T22:22:19+5:30
शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका 20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा...

गुंगीचे औषध देऊन 20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा मोकाट
आॅनलाइन लोकमत
ठाणे, दि. 11 - शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका 20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा विशाल पवार (25) हा अद्यापही वर्तकनगर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पिडीत महिलेचा पती आणि विशाल एकमेकांचे मित्र आहेत. तो ज्या ठिकाणी कामावर आहे त्याच मॉलमध्ये ती देखिल नोकरीला असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. त्याचाच गैरफायदा घेऊन त्याने तिचा विश्वास संपादन केला. यातूनच शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्या चिरागनगर येथील घरी त्याने लैंगिक अत्याचार केले. त्याचीच मोबाईलमध्ये चित्रफित करुन त्याने गेल्या वर्षभरात वारंवार तिच्यावर अत्याचार केला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एस. तांबे, महिला उपनिरीक्षक एस. आर. अडसुळे आणि तीन कर्मचारी असे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्याचा घरी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, तो पोलिसांना हुलकावणी देत आहे. त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असाही दावा वर्तकनगर पोलिसांनी केला आहे.