शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय साहित्याऐवजी मोबाइल खरेदी! आदिवासी आश्रमशाळांमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:43 IST

शालेय साहित्याच्या खरेदीसाठी सरकारने बँक खात्यावर जमा केलेल्या पैशातून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी मोबाइलची खरेदी, तसेच कर्ज/उधारी फेडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थेट बँक खात्यात पैसे टाकण्याच्या (डीबीटी) योजनेमागील उद्देश पहिल्या वर्षी तरी पूर्णत: यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही.

विशेष प्रतिनिधी मुंबई : शालेय साहित्याच्या खरेदीसाठी सरकारने बँक खात्यावर जमा केलेल्या पैशातून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी मोबाइलची खरेदी, तसेच कर्ज/उधारी फेडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थेट बँक खात्यात पैसे टाकण्याच्या (डीबीटी) योजनेमागील उद्देश पहिल्या वर्षी तरी पूर्णत: यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही.राज्यातील ५०० आदिवासी आश्रमशाळांमधील १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शालेय साहित्याच्या (गणवेश, बुटांसह) आधी ६० टक्के रक्कम टाकण्यात आली. या रकमेतून विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचीच खरेदी केली, याची खातरजमा करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली होती. त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास तसा अहवाल पाठवायचा होता.मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून साहित्याची खरेदी करण्यात आल्याचे प्रमाणित केले आणि त्यामुळे ४० टक्के रकमेचा दुसरा हप्ताही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. मात्र, हा पैसा दिला, त्याच कामासाठी तो खर्च झाला की नाही, याची शाहनिशा करणारी प्रभावी यंत्रणा आदिवासी विकास विभागाने तयार केली नाही. सर्वस्वी मुख्याध्यापकांच्या अहवालावर योजनेचे भवितव्य सोपविण्यात आले. विशेषत: नाशिक, नागपूर, अमरावती या विभागांमध्ये ६० टक्के रकमेच्या पहिल्या हप्त्याचा योग्य वापर झाला की नाही, याची खातरजमा न करता प्रमाणपत्रे दिल्याची माहिती ‘लोकमत’कडे आहे.पारदर्शकतेच्या दृष्टीने डीबीटी ही चांगली पद्धत आणली गेली डीबीटी योजना यशस्वी करायची असेल तर स्थानिक ग्रामस्थांची एक समिती नेमावी आणि ही समिती व मुख्याध्यापकांनी डीबीटीमार्फत आलेल्या रकमेतून शालेय साहित्यच खरेदी करण्यात आले की नाही याची खातरजमा करावी, अशी सूचना पुढे आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMobileमोबाइल