एसटी चालकाला भररस्त्यात खेचून मारलं! डोक्याला गंभीर दुखापत, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:07 IST2026-02-10T12:01:59+5:302026-02-10T12:07:53+5:30

Attacks On ST Bus Driver: सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रावणगाव येथे एका कारमधील ४ ते ५ जणांनी धावत्या एसटी बसला आडवे येऊन एसटी चालकाला खाली खेचले आणि बेदम मारहाण केली.

Mob Attacks ST Bus Driver on Pune-Solapur Highway; Car Intercepts Bus, Attackers Booked After Video Goes Viral | एसटी चालकाला भररस्त्यात खेचून मारलं! डोक्याला गंभीर दुखापत, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप

एसटी चालकाला भररस्त्यात खेचून मारलं! डोक्याला गंभीर दुखापत, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप

पुणे सोलापूर महामार्गावर रावणगाव येथे एसटीला कार आडवी लावून कार मधील चार ते पाच जणांनी एसटी चालकाला खाली खेचून बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. याबाबत एका प्रवाशाने काढलेल्या व्हिडिओच्या आधारे घटनेला वाचा फुटली असून कार मधील(क्रमांक एम एच 42 बी एन 7798) चार ते पाच जणांवर  रावणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत सोलापूर आगारातील एसटी चालक अतुल भोसले जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मंगळवारी शुद्धीवर आल्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एसटी मधील काही प्रवाशांनी रुग्णवाहिका बोलावून चालकाला दौंड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तसेच एका प्रवाशांने या घटनेचा व्हिडिओ काढून नंतर चालकाच्या मोबाईलवर पाठवला. चालक आज शुद्धीवर आल्यानंतर त्याने तो राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्म सहकाऱ्यांना पाठवला. त्यानंतर सोलापूरचे आगार प्रमुखांनी दौंड येथे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रावणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप 

महामार्गावर भर दुपारी एसटी बस अडवून  चालकाला अशी बेदम मारहाण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी बस आणि कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. संबंधितांना अटक न झाल्यास एसटी कर्मचारी आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सोलापूर तथा पुणे प्रादेशिक सचिव प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

Web Title : एसटी बस चालक की राजमार्ग पर बेरहमी से पिटाई; आक्रोश भड़का।

Web Summary : पुणे-सोलापुर राजमार्ग पर एसटी बस चालक की गंभीर रूप से पिटाई की गई। यात्रियों ने उसे अस्पताल पहुंचाया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। एसटी कर्मचारी संघ सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं और गिरफ्तारी न होने पर विरोध प्रदर्शन की धमकी दे रहे हैं।

Web Title : ST bus driver brutally beaten on highway; outrage erupts.

Web Summary : An ST bus driver was severely beaten on the Pune-Solapur highway. Passengers helped him to the hospital. Police have registered a case. ST employee unions are demanding strict action and threaten protests if arrests aren't made.