दोघांवर जमावाचा हल्ला, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: August 1, 2015 01:12 IST2015-08-01T01:12:20+5:302015-08-01T01:12:20+5:30

अकोल्यात संचारबंदीसदृश्य स्थिती

The mob attack on both, the death of one | दोघांवर जमावाचा हल्ला, एकाचा मृत्यू

दोघांवर जमावाचा हल्ला, एकाचा मृत्यू

अकोला : अकोला शहरातील गुलजारपुरा भागात दोन युवकांवर १0 ते १२ जणांनी शुक्रवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण होऊन, शहरात संचारबंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली. प्राथमिक माहितीनुसार, गुलजारपुरा भागात दोन युवकांवर तलवारी, कत्ते, पाईप, दगडं इत्यादी शस्त्र घेऊन आलेल्या एका जमावाने हल्ला चढवला. दोघांच्या पोटात या जमावाने तलवारी भोसकल्या. या हल्ल्यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. खबरदारी म्हणून गुलजारपुर्‍यात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हल्ल्याची वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरून काहीवेळ तणाव निर्माण झाला. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करायला लावली.

Web Title: The mob attack on both, the death of one