'भारत जोडो' हे तर दाखवायचे दात, मनसेची राहुल गांधींवर टीका; 'राष्ट्रीय पप्पू' असा उल्लेख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 14:21 IST2022-11-17T14:18:28+5:302022-11-17T14:21:17+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे.

'भारत जोडो' हे तर दाखवायचे दात, मनसेची राहुल गांधींवर टीका; 'राष्ट्रीय पप्पू' असा उल्लेख!
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हळूहळू ही यात्रा पुढे जात आहे. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. याशिवाय त्यांनी गांधी यांचा 'राष्ट्रीय पप्पू' असा देखील उल्लेख केला आहे.
खरं तर कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. यावरूनच आमदार राजू पाटील यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणेच चुकीचे असल्याचे पाटील यांनी म्हटले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अपमान आहे. पण 'राष्ट्रीय पप्पू'ला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. 'भारत जोडो' हे दाखवायचे दात आणि द्वेष पसरवणारे खरे दात यातला फरक स्पष्ट आहे. #MNS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) November 17, 2022
सावरकरांचा अपमान म्हणजे भारताचा अपमान - राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अपमान आहे. पण 'राष्ट्रीय पप्पू'ला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. 'भारत जोडो' हे दाखवायचे दात आणि द्वेष पसरवणारे खरे दात यातला फरक स्पष्ट आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"