"दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:07 PM2021-09-23T15:07:11+5:302021-09-23T15:07:48+5:30

शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केला संताप. डोंबिवलीत १४ वर्षांच्या मुलीवर ३० नराधमांनी केले अत्याचार.

mns leader shalini thackeray slams cm uddhav thackeray over dombivali 14 year girl gangraped 30 people | "दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे"

"दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे"

Next
ठळक मुद्देशालिनी ठाकरे यांनी व्यक्त केला संताप. डोंबिवलीत १४ वर्षांच्या मुलीवर ३० नराधमांनी केले अत्याचार.

राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पत्रवाद रंगला असताना आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरातील १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी आत्तापर्यंत २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. राज्यात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

"डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे?" असा सवाल करत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

 
मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचं समजतं. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवरुन एकमेकांची उणीधुणी काढण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे या घटनांना रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचंही उघड होत आहे.

Web Title: mns leader shalini thackeray slams cm uddhav thackeray over dombivali 14 year girl gangraped 30 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app