“प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 11:19 AM2021-04-04T11:19:27+5:302021-04-04T11:22:52+5:30

Lockdown: मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे.

mns leader sandeep deshpande criticised cm uddhav thackeray on lockdown | “प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”

“प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”

Next
ठळक मुद्देमनसेकडून ठाकरे सरकारवर टीकासंदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून साधला निशाणारँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय - मनसे

मुंबई: काही भागांत कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, लोकं ऐकत नाहीत. त्याऐवजी राज्यात एकदम बंद करून हळूहळू सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा होतो, हा माझा अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केल्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (sandeep deshpande criticised cm uddhav thackeray)

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हला प्रत्युत्तर म्हणून संदीप देशपांडे यांनीही फेसबुक लाइव्ह केले. यावेळीही त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. 

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

काय म्हणाले संदीप देशपांडे

१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँड ने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. दुसरीकडे, रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी शनिवारी केली. 

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता

तत्पूर्वी, गेल्या वर्षभरात राज ठाकरे अनेकांना भेटले. डबेवाले, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, शिक्षक, मच्छिमार बांधव असोत, या सर्वांना राज ठाकरे भेटले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सातत्याने आणि नियमितपणे राज ठाकरे यांनी केले. आमच्यावर टीका करण्याचा तुम्हांला बिलकूल अधिकार नाही. तुम्ही घरी बसून होता आणि राज ठाकरे जनतेला भेटत होते. गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता. राज ठाकरे लोकांना भेटत असल्यामुळे कृष्णकुंजवर गर्दी वाढत होती. तुम्ही कोणालाच भेटत नव्हता, त्यामुळे तुमच्याकडे कोणीही येत नव्हते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. 

दरम्यान, लॉकडाऊनच्या भीतीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच यापूर्वीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगार पुन्हा घरची वाट धरू लागले आहेत. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 
 

Web Title: mns leader sandeep deshpande criticised cm uddhav thackeray on lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.