शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

प्रत्येकाला 'जागा' दाखवली; राज ठाकरेंनी मोदींना चक्क कोर्टात खेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 23:11 IST

सीबीआयवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचे मोदींना फटकारे

मुंबई: सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवणाऱ्या मोदी सरकारला आज सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला. आता यावरून राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून फटकारले आहे. न्यायालयानं प्रत्येकाला जागा दाखवली, असा टोला राज यांनी लगावला. मोदींनी हटवलेल्या वर्मा यांची आज न्यायालयानं सीबीआयच्या संचालकपदी फेरनियुक्ती केली. यावरून राज यांनी मोदींना समाचार घेतला. 

राज ठाकरेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात कोर्टरूम दाखवण्यात आली आहे. त्यात एका बाजूला मोदी आरोपीच्या पिंजऱ्यात दाखवलेले आहेत. त्यांच्यासमोर सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा सूटाबूटात उभे आहेत. त्यांना न्यायमूर्ती 'या वर्माजी बसा' असं म्हणत सीबीआय संचालकांच्या खुर्चीकडे बोट दाखवत आहेत. हे चित्र पाहून मोदींना रडू कोसळलं आहे. राद यांनी या व्यंगचित्राला 'प्रत्येकाला जागा दाखवली' असं शीर्षक दिलं आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला होता. मध्यरात्री हा निर्णय घेण्यात आला. मात्र हा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा झटका दिला. याप्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटवले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असं सांगत न्यायालयानं आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला. आलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी राहतील. मात्र, संचालकपदी असताना कोणतेही मोठे निर्णय ते घेऊ शकणार नाहीत. तसेच, त्यांच्याबाबतीत उच्च स्तरीय समितीनं एका आठवड्यात निर्णय घ्यावा, असंही यावेळी न्यायालयानं सांगितलं.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMNSमनसे