शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएचा नियंत्रण कक्ष सज्ज

By admin | Updated: June 15, 2016 03:28 IST

पावसाळ््यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे याचबरोबर वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जय्यत तयारी केली आहे. पावसाळ््यात

मुंबई : पावसाळ््यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे याचबरोबर वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जय्यत तयारी केली आहे. पावसाळ््यात जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी एमएमआरडीएचे पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून, मुंबई महापालिका आणि पोलिसांच्याही संपर्कात राहणार आहे. एमएमआरडीएद्वारे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या परिसरात पावसाळ्यादरम्यान होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचू नये, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी तक्रार आल्यास, त्यावर तातडीने उपाय करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कंत्राटदारांना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची तंबी एमएमआरडीएने दिली आहे. यात प्रकल्पांच्या बांधकामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर साचणाऱ्या चिखलाची विल्हेवाट लावणे या सूचनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)हेल्पलाइनएमएमआरडीएकडून ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६ आणि ८०८०७०५०५१ हे दूरध्वनी क्रमांक मदतीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, तर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जे.आर. ढाणे नियंत्रण कक्षाचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहणार असून, ०२२-२६५९५९३३ संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.