आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 06:59 IST2022-11-26T06:58:03+5:302022-11-26T06:59:00+5:30
या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसह मंत्री, आमदार आणि खासदारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत.

आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसह शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना होत आहेत.
या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसह मंत्री, आमदार आणि खासदारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. हे सगळे कामाख्या देवीचे दर्शन घेणार असून आसाम सरकारचा पाहुणचारही घेणार आहेत. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. मात्र जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत. या दौऱ्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची एकनाथ शिंदे सदिच्छा भेट घेण्याची शक्यता आहे. आसाम सरकारने शिंदे व साेबतच्या आमदार, खासदारांना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे.