शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
3
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
4
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
5
डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
6
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
7
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
8
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
9
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
10
Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो
11
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
12
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
13
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
14
एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
15
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
16
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
17
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
18
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
19
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
20
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:02 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Maharashtra Politics: अवघ्या देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने आमदार रवी राणा यांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामुहिक हनुमान चालिसा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुमच्या रक्तात हिंदूत्व असले पाहिजे. तुमच्या मनामनात हिंदुत्व असले पाहिजे. आमच्या हनुमान चालिसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावे, असे आवाहन करत, हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत, उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. उद्धव ठाकरे जोवर हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे. 

केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका

ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमानाचा विरोध केला. ज्या सरकारने हनुमान चालीसा म्हणणाऱ्या एका महिला खासदाराला तुरुंगात टाकले, ही गोष्ट महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीबाबत राणा म्हणाले की, त्यांनीदेखील मिरवणूक काढली पाहिजे. पण मनापासून काढावी, केवळ निवडणूक डोळ्यासमोर हे सगळे करू नका, असा टोला रवी राणा यांनी लगावला. तसेच ज्यांनी प्रभू श्रीरामाचा, भगवान हनुमंताचा अवमान केला, हनुमान चालीसा वाचण्यावरून खासदार नवनीत राणा आणि माझ्यावर राजद्रोह दाखल केला, आम्हाला तुरुंगात टाकले, ते लोक धार्मिक सोंग करून हिंदू मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत. परंतु हिंदूंना यांचा खरा चेहरा माहिती आहे, असे रवी राणा म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत, अशी विचारणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही.  ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती