Ajit Pawar On MLA Fund: आमदार फंडात 1 कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला; अजित पवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:43 IST2022-03-16T18:41:48+5:302022-03-16T18:43:39+5:30
MLA Fund: आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीमध्ये 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

Ajit Pawar On MLA Fund: आमदार फंडात 1 कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला; अजित पवारांची घोषणा
मुंबई:आमदारनिधीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व आमदारांच्यानिधीत 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता आमदारांचा विकास निधी 4 कोटी रुपयांवरुन 5 कोटी रुपये झाला आहे. अजित पवारांनी आज याबाबतची घोषणा केली. याशिवाय, आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारातही पाच-पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे.
"Maharashtra Govt has decided to increase the MLA fund to Rs 5 Crores from the existing Rs 4 Crores," says Maharashtra Deputy CM Ajit Pawar in the State Assembly
— ANI (@ANI) March 16, 2022
(File pic) pic.twitter.com/IYBIggco9Y
आमदारांना मिळणारा विकास निधी 4 कोटींवरुन 5 कोटी करण्याचा निर्णय अजित पवारांनी सभागृहात जाहीर केला. "स्थानिक विकास निधी 4 कोटी होता, मी तो आता 5 कोटी जाहीर करतो. खासदारांना देखील केंद्राने 5 कोटी द्यायला दिला नाही. पण आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे", असे अजित पवार यावेळी म्हणाले.
पीए-ड्रायव्हरच्या पगारात वाढ
विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. आमदारांच्या विकास निधीसह त्यांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारातही वाढ झाली आहे. त्यानुसार, ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला