जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:18 PM2023-11-24T19:18:33+5:302023-11-24T19:18:59+5:30

मराठा समाजाचे जे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटील यांचे आंदोलन आता भरकटतंय का असं म्हणण्यास वाव आहे असं मिटकरी म्हणाले.

MLA Amol Mitkari criticizes Manoj Jarange Patil's Maratha reservation Andolan | जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

मुंबई - मनोज जरांगे पाटील यांची पूर्वीची भूमिका आणि आत्ताची भूमिका बदलल्यासारखी वाटते. मराठा समाजाची आधीची मागणी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या अशी होती. त्यानंतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी झाली. त्यानंतर ओबीसी नेत्यांनी काही आक्षेप घेतले. कुणबी नोंदी शोधण्याचं काम सरकार करतंय. परंतु जरांगे पाटील यांचे आंदोलन राजकीय दिशेने भरकटताना दिसतंय असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला. 

अमोल मिटकरी म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांच्या अलीकडच्या टीका पाहिल्या तर लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागतंय, भुजबळ तुला जागा दाखवू.भुजबळांचा एकेरी उल्लेख करू नये. ते वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे भुजबळांवर टीका करताना तोल ढासळू देऊ नका. तुम्ही आरक्षणाचे नेतृत्व करताय तर त्याबाबतीत विधाने करा. तुम्ही राजकीय विधाने करू नका. सरकार तुमचे प्रश्न सोडवायला समर्थ आहे. अधिवेशनात सरकार सकारात्मक मराठा आरक्षणावर निर्णय देणार आहे. पण ज्यावेळी भुजबळांनी त्यांच्या भाषणात प्रकाश सोळुंखे आणि अन्य लोकांची घरे जाळल्यानंतर जे बोलले त्यावर आतापर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर जी टीका करतायेत ते नक्कीच अशोभनीय आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठा समाजाचे जे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटील यांचे आंदोलन आता भरकटतंय का असं म्हणण्यास वाव आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी भाषा योग्य वापरावी अशी माझी त्यांना विनंती आहे असंही मिटकरींनी जरांगे पाटलांना सल्ला दिला. 

सुषमा अंधारे यांनीही केली होती टीका

मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढताहेत, असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या आठ-पंधरा दिवसांतल्या त्यांच्या भूमिका आहेत त्या पाहिल्या तर कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसत आहे. आरक्षणावरचा फोकस हलून वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे हे शोभत नाही. एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुढे पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे तुम्ही आर्थिक मागाससलेले म्हणता दुसरीकडे शंभर शंभर जेसीबीतून फुलांची उधळण करून देता. एकीकडे आमच्याकडे काहीच नाही म्हणता, दुसरीकडे तुमच्या सभेसाठी दीडशे एकर मोसंबीची बाग तोडली जाते. एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय असंही म्हणता, ही विधानं चुकीची आहेत, असं स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. 

Web Title: MLA Amol Mitkari criticizes Manoj Jarange Patil's Maratha reservation Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.