शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मिशन महापौर

By admin | Updated: August 29, 2014 01:06 IST

महापालिकेच्या सचिव कार्यालयाने महापौर-उपमहापौर निवडीची अधिसूचना जारी केली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राजे रघोजी भोसले, नगरभवनात आयोजित विशेष सभेत महापौर- उपमहापौरांची

१ सप्टेंबरला भरा अर्ज, ५ रोजी निवडणूक : प्रवीण दटकेंना संधी नागपूर : महापालिकेच्या सचिव कार्यालयाने महापौर-उपमहापौर निवडीची अधिसूचना जारी केली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राजे रघोजी भोसले, नगरभवनात आयोजित विशेष सभेत महापौर- उपमहापौरांची निवड केली जाईल. या दोन्ही पदांसाठी इच्छुक उमेदवारांना १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सचिव कार्यालयात अर्ज दाखल करायचे आहेत. महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) राखीव असून, महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणे निश्चित मानले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांनी बजावलेली भूमिका पाहता यावेळी उपमहापौरपद अपक्षांना देण्याची तयारी भाजपने चालविली असून, यात अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमहापौरपदासाठी पुन्हा वेटिंगवर राहावे लागण्याची चिन्हे आहेत.प्रवीण दटके हे मध्य नागपुरातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे तशी मागणीही केली आहे. महापौरपद नको, मध्यचे तिकीट हवे, अशी आग्रही भूमिका दटके यांनी घेतली होती. मात्र, हलबा समाजाचे प्राबल्य असलेल्या मध्य नागपुरातून आ. विकास कुंभारे यांचे तिकीट कापून दटके यांना उमेदवारी देण्याची रिस्क घेण्यास भाजप नेते तयार नाहीत. अशात पक्षहितासाठी महापौरपद घेऊन पुढील संधीवर दावा कायम ठेवण्याचा सल्ला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दटके यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर दटके महापौर होतील, असे निश्चित मानले जात आहे. असे असले तरी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक ३० आॅगस्ट रोजी होत आहे. तीत महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. खानापूर्तीसाठी शिवसेनेचे समर्थन महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना युती होती. यापूर्वीही महापालिकेत युतीची सत्ता आली तेव्हा महापौर भाजपचा व उपमहापौर शिवसेनेचा, असे सूत्र पाळले गेले. मात्र यावेळी निवडणुकीनंतर भाजपने सेनेला डच्चू दिला. भाजपने अपक्षांना हाताशी धरून सत्तास्थापनेचा मार्ग सुकर केला. खानापूर्तीसाठी शिवसेनेचे समर्थन घेतले गेले. भाजपने उपमहापौरपदी संदीप जाधव यांची नियुक्ती केली. सव्वा वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्याच जैतुनबी अन्सारी या मुस्लीम समाजाच्या नगरसेविकेला उपमहापौरपद देण्यात आले. यावेळी अपक्षांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची दखल घेत, अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांना उपमहापौरपद देण्याची तयारी भाजपने चालविली आहे. (प्रतिनिधी)