अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: October 4, 2015 02:40 IST2015-10-04T02:40:35+5:302015-10-04T02:40:35+5:30

फिरायला जाण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे.

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

- समीर कर्णुक,  मुंबई

फिरायला जाण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
चेंबूरच्या वाशी नाका परिसरात ही मुलगी तिच्या आई-वडीलांसोबत राहते. याच परिसरात आरोपी सलमान खान (२४)हा राहतो. मुलीसोबत त्याची चांगली ओळख असल्याने या आरोपीने मार्च महिन्यामध्ये या मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सायन परिसरात एका नातेवाईकाच्या घरी नेले. मात्र त्या दिवशी त्या घरी सर्व जण असल्याने पुन्हा या आरोपीनी मुलीला वाशी नाका येथे नेले. येथील शाहबाज खान (२१) या मित्राच्या घरी नेले. यावेळी शाहबाज घरात एकटाच होता. या ठिकाणी मुलीला मद्य पाजल्यानंतर या दोन्ही आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलीला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही. हीच संधी साधत या आरोपींनी त्यानंतर अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.
ही बाब या दोन्ही आरोपींचा साथीदार इरफान खान (२३) याला समजली. त्याने ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. तिने ही बाब आपल्या आई-वडीलांनी शनिवारी सांगितल्यावर त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या प्रकरणी सलमान आणि शाहबाज या दोन्ही आरोपींना अटक केली आहे, तर इरफानचा पोलीस शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Minor girl gang rape