शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर मंत्र्यांना बंगल्यात कोंडू!’

By admin | Updated: December 17, 2014 03:23 IST

‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचे आश्वासन दिलेल्या युती सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर मंत्र्यांना त्यांच्या राहत्या बंगल्यात कोंडू,’

मुंबई : ‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचे आश्वासन दिलेल्या युती सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर मंत्र्यांना त्यांच्या राहत्या बंगल्यात कोंडू,’ असा इशारा अखिल भारतीय मातंग संघाने दिला आहे. सरकारला इशारा देण्यासाठी १८ डिसेंबरला संघटनेच्या वतीने नागपूर येथे धडक मोर्चाही काढणार असल्याचे संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात विरोधी बाकावर असताना युतीचे सरकार आल्यावर मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा गोपले यांनी केला आहे. त्यामुळे आता सत्ता आल्यावर आश्वासन पूर्ण करावे. अन्यथा रस्ते आणि लाल दिव्यांच्या गाड्या दिसेल तिथे अडवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास मंत्र्यांना बंगल्याबाहेर पडू देणार नाही, त्यांना त्यांच्या निवासस्थानीच रोखून ठेवू, असा इशारा गोपले यांनी दिला आहे.दरम्यान, मराठा आरक्षण समितीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाच्या आरक्षणासाठीही समिती स्थापन करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. राज्यात १ कोटी २० लाख मातंग असून, समाजात विविध ३२ जाती आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीमधील आरक्षणाचा म्हणावा तितका फायदा होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)