“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:36 IST2025-11-28T19:36:13+5:302025-11-28T19:36:56+5:30
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: विजय वडेट्टीवार यांना भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या रुपात आशेचा किरण दिसेल, अशी खात्री आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: आम्ही सुखाने नांदत आहोत. आम्ही नांदत असताना तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घ्या. लंकेची उपमा फक्त रावण होता म्हणून लंका वाईट आहे, असे नाही. कदाचित त्यांनी इतिहास वाचला नसेल. माझा विजय वडट्टेवार यांना सल्ला आहे की, काँग्रेसमध्ये काही शिल्लक राहिलेले नाही. त्यांना मान-सन्मान आम्ही शिवसेनेत देतो. विदर्भातील ते एक चांगले नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा, अशी खुली ऑफर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली.
या निवडणुकीच्या निमित्ताने एवढ्यासाठीच विनंती करत आहे की, त्याला कारण आहे. माझ्या शेजारी सिद्धराम म्हेत्रे आहेत. जे ६० वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या आधीपासून काँग्रेसमध्ये होते. ज्यावेळेस त्यांना राजकारणापासून अलिप्त व्हावे, असे वाटू लागले, त्यावेळेस त्यांना एकच आशेचा किरण दिसला, ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यामुळे वडेट्टीवार यांनाही हा आशेचा किरण भविष्यात दिसेल, अशी खात्री आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे
युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे परिपक्व राजकारणी आहेत. त्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही, असे उदय सामंत म्हणाले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल आहे तो मी ऐकलेला नाही, पण मी याबाबत वाचले आहे. त्यामध्ये कुठेही निवडणुकांना बंधन घातलेले नाही. मात्र निकाल देत असताना काही गोष्टींच्या अधीन राहून तो निकाल देण्यात आलेला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, मी कोणाचीही उणी-धुणी काढलेली नाहीत. माझ्या राजकीय जीवनात लोक माझी उणी-धुणी काढतात. सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे, त्यात थोडेफार मागेपुढे झाले असेल. मात्र निवडणुकीनंतर सर्वकाही व्यवस्थित घडेल. सिंधुदुर्गात काही वाद झाले, ते गैरसमजातून झाले असावेत मात्र ते लवकर दुरुस्त होतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.