राज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 05:48 AM2021-01-18T05:48:15+5:302021-01-18T05:48:49+5:30

पोलिसांच्या या कारवाईविरोधात मंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Minister of State Yadravkar stopped by police, Karnataka border; Incident at Kognoli toll plaza | राज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना

राज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना

Next

जयसिंगपूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेले आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटकपोलिसांनीमहाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजता अडविले. यावेळी मंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

पोलिसांच्या या कारवाईविरोधात मंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आम्हाला वाटतो. आम्ही हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही यड्रावकर म्हणाले. 

Web Title: Minister of State Yadravkar stopped by police, Karnataka border; Incident at Kognoli toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.