राज्यात पुराचं थैमान; मदत, पुनर्वसनमंत्री पक्षाच्या बैठकीत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:03 IST2019-08-08T17:25:25+5:302019-08-08T18:03:10+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे होते. परंतु, यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच पत्ता नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात पुराचं थैमान; मदत, पुनर्वसनमंत्री पक्षाच्या बैठकीत !
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराची सर्वाधिक झळ बसली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटना समोर येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. मात्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख मंत्रालयातूनच परिस्थितीचा आढावा घेत असून पक्षाच्या बैठकीत व्यस्त आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे होते. परंतु, यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच पत्ता नव्हता. मदत आणि पुनर्वसन मंत्री देशमुख पुण्यात शक्ती केंद्राच्या बैठकीत हजर होते, असंही समजते. राज्यात पुराने हाहाकार लावला असताना मंत्री मात्र पक्षाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे चित्र आहे.
यावर सुभाष देशमुख यांनी आपली बाजू मांडली असून आपण केवळ बैठकीला गेलो नव्हतो. परंतु, जाता-जाता कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यासाठी आपण पक्षाच्या बैठकीत डोकावयाला गेलो होतो, असंही देशमुख यांनी सांगितले.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक नेते प्रत्यक्ष मदत करताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्यांच्या पत्नी शैलजा पाटील, काँग्रेसनेते विश्वजीत कदम, बंटी पाटील पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना मदत करताना दिसून आले. मात्र मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांकडून बैठकांचा धडका सुरू आहे. वास्तविक पाहता ग्रावउंड पातळीवर
दरम्यान सुभाष देशमुख यांच्या फेसबुक पेजवरच राज्यातील पुरस्थितीचा आढावा मंत्रालयातून घेत असल्याचे नमूद करण्यात आले. पुरग्रस्त भागात अत्यावश्यक सुविधा पोहचविण्यात यश येत असल्याचे त्यांच्या पेजवर म्हटले आहे. प्रत्यक्षात हजारो नागरिक अजुनही पुरात अडकलेले आहेत.