शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:08 IST

पुण्यात केरळबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Nitesh Rane: मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असं विधान नितेश राणेंनी केले. त्यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, मंत्री नितेश राणे यांनी आपण  वस्तुस्थितीच्या आधारावर बोललो असल्याचे म्हटलं आहे.

सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नितेश राणे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मस्त्य आणि बंदर खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे. प्रियांका गांधी त्यांच्यामुळे खासदार झाल्याचे वक्तव्य नितेश राणेंनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता रोष व्यक्त केला जातोय. मात्र आपण फक्त वस्तुस्थिती मांडल्याचे नितेश राणेंनी म्हटलं.

"केरळ हा आपल्या देशाचा एक भाग आहे. पण हिंदूंची कमी होत चाललेल्या लोकसंख्येची प्रत्येकाने काळजी करायला हवी. हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतर करणे ही तिथे रोजची गोष्ट बनली आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. मी तिथल्या परिस्थितीची तुलना पाकिस्तानातील हिंदूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी करत होतो. केरळमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली तर त्याचा विचार करायला हवा. आमचे हिंदु राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच राहावे अशी आमची इच्छा आहे आणि हिंदूंचे सर्व प्रकारे रक्षण झाले पाहिजे. मी फक्त वस्तुस्थिती मांडत होतो जेणेकरून सर्वांना कळेल की परिस्थिती काय आहे. मी जे काही बोललो ते वस्तुस्थितीवर आधारित आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रविवारी पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधीवर निशाणा साधला. "हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरायची गरज नाही. हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. मंत्री असल्याने आता बंधन आलेत," असं नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KeralaकेरळBJPभाजपाcongressकाँग्रेस