मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:25 IST2026-04-04T14:24:38+5:302026-04-04T14:25:21+5:30

अधिकृत कागदपत्रातून सत्य स्पष्ट; सोशल मीडियावरील दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा

Minister Chandrashekhar Bawankule's claim of 1147 acres is wrong, FIR filed in defamation case | मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरा दाखल झालेल्या FIR मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम 78(1)(ii) आणि 356(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तक्रारदार निखिल रामचंद्र इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रामेश्वर दरेकर याने महसूल मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ११४७ एकर जमीन असल्याचा दावा केला होता. हा व्हिडिओ ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. या दाव्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन बावनकुळे कुटुंबाची बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अधिकृत कागदपत्रातून उघड झालेले सत्य

तहसीलदार, कामठी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण जमीन सुमारे २८.४४ एकर आहे. ही जमीन विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये नोंद आहे. ११४७ एकरचा दावा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

Web Title : मंत्री बावनकुले पर 1147 एकड़ का झूठा दावा, मानहानि का मामला दर्ज।

Web Summary : मंत्री बावनकुले के नाम पर 1147 एकड़ जमीन के झूठे दावे पर नागपुर में मामला दर्ज। आधिकारिक दस्तावेजों के अनुसार, परिवार के पास लगभग 28.44 एकड़ जमीन है। पुलिस मानहानि के मामले की जांच कर रही है।

Web Title : False claim of 1147 acres against Minister Bawankule, FIR filed.

Web Summary : An FIR was filed in Nagpur against the spread of misleading information about Minister Bawankule owning 1147 acres of land. Official documents reveal the family owns approximately 28.44 acres. Police are investigating the defamation case.