तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:35 IST2025-06-05T14:27:55+5:302025-06-05T14:35:39+5:30

Ladki Bahin Yojana May Month 2025 Installment: अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कोट्यवधी महिलांना दिलासा देणारी माहिती दिली आहे.

minister aditi tatkare given information ladki bahin yojana may month 2025 installment has been started and has the money arrived in your account | तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात

तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana May Month 2025 Installment:महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील हप्ता कधी मिळणार, याबाबत लाडक्या बहि‍णींच्या मनात धाकधूक होती. परंतु, मंत्री अदिती तटकरे यांनी कोट्यवधी महिलांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच आता मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. अदिती तटकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, मध्य प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या ‘लाडली बहन’ योजनेने आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच वाटेवरून आम्ही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. राज्यात महायुतीचे एक बळकट सरकार स्थापन झाले. ही आजवरचा सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक विजय असल्याचे मत व्यक्त करत, आम्ही चौहान यांचे आभारी आहोत, अशी कृतज्ञता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: minister aditi tatkare given information ladki bahin yojana may month 2025 installment has been started and has the money arrived in your account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.