शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

औरंगाबाद : वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे MIM नगरसेवक मतीन यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 11:33 AM

मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावर भाषण करण्यास नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला होता. यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या होत्या.

या प्रकरणी मतीन यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शुक्रवारी रात्री मतीन यांना अटक करण्यात आली आहे.  तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या तीन नगरसेवकांवर व इतर दोघांवर मतीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या तक्रारीवरून झाली अटक उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, १७ ऑगस्ट रोजी महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास महापौर नंदकुमार घोडेले  यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ठराव मांडून  श्रद्धांजली वाहण्यात आली. सदस्यांची श्रद्धांजलीपर भाषणे चालू असताना एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन रशीद हा सभागृहामध्ये उभा राहिला आणि ओरडून दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलत होता. यावरून  सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तो सभागृहाबाहेर गेला आणि तेथे उभ्या असलेल्या लोकांना चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तोडफोड प्रकरणी दोघे अटकेत पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान ७५ ते १०० जणांच्या घोळक्याने महानगरपालिकेच्या बाहेर गोंधळ घातला. यावेळी त्यांनी दोन चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी महमद आवेज महमंद सिद्दिकी व आणखी एकास अटक केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज पासून आणखी अटक करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

या प्रकरणी मतीन यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शनिवारी मतीन यांना अटक करण्यात आली आहे.  तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा