शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:40 IST

ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. कल्याण-दिवा जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ या वेळेत ब्लॉक असेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. कल्याण-दिवा जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ या वेळेत ब्लॉक असेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल.
चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक काळात सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर धावतील. त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याण-दिवा जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ या वेळेत ब्लॉक घेतला जाईल. तसेच कल्याणवरून सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ या काळात सुटणाऱ्या सर्व लोकल कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तसेच ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ या वेळेत सुटणाºया डाऊन जलद गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. डाऊन हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/ बेलापूर/ पनवेलपर्यंतची सेवा सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७पर्यंत बंद राहील. डाऊन हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/ अंधेरी/ गोरेगावपर्यंत सेवा सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३पर्यंत बंद राहील.

विशेष लोकल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/ बेलापूर/ वाशी या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रविवारी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत बंद राहील. अप हार्बर लाइनवर वांद्रे/ अंधेरी/ गोरेगावपर्यंतची सेवा सकाळी १०.४५ ते ४.५८ या वेळेत बंद राहील. यावेळी मुंबईत दाखल होणाºया मेल/ एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटे उशिराने पोहोचतील. तर, हार्बर मार्गावर पनवेल ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलMumbaiमुंबई