शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकललाच झाला क्षयरोग!

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

‘क्षयरोग’ हा राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमात येतो. परंतु मेडिकलच्या छाती व क्षयरोग विभागाला तब्बल आठ महिन्यांपासून वॉर्ड नाही. परिणामी गंभीर रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात आहे.

प्रभावी औषधे नाही : आठ महिन्यांपासून वॉर्डही बंदसुमेध वाघमारे - नागपूर‘क्षयरोग’ हा राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमात येतो. परंतु मेडिकलच्या छाती व क्षयरोग विभागाला तब्बल आठ महिन्यांपासून वॉर्ड नाही. परिणामी गंभीर रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात आहे. दुसरीकडे या विभागात आवश्यक यंत्रणा आहे, तज्ज्ञ डॉक्टर आहेत. परंतु नव्या औषधी व तंत्रज्ञानाच्या अभावाने रुग्ण अडचणीत सापडले आहेत. विशेषत: या आजारावर प्रभावी असलेले ‘इन्हेलर’ही दिले जात नसल्याने मेडिकललाच क्षयरोग झाल्याचे चित्र आहे. भारतात सध्याच्या स्थितीत अस्थमाच्या रु ग्णांची संख्या सुमारे दोन कोटी आहे. एकट्या नागपुरात सुमारे तीन लाख अस्थमाचे रुग्ण आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक लहान मुलांना अस्थमाचा त्रास असल्याचे सांगण्यात येते. वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे क्षयरोगाचे रुग्ण वाढत असतानाही मेडिकलच्या छाती व क्षयरोग विभागाला घेऊन कुणीच गंभीर नाही. मेडिकलपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा विभाग वाळीत टाकल्याप्रमाणेच आहे. याच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २०० वर रुग्ण येतात. यातील पाच ते दहा तरी रुग्णांना भरती करून उपचार करणे आवश्यक असते. परंतु किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी बंद करण्यात आलेला वॉर्ड अद्यापही कुलूपातच आहे. रुग्णाला मेयो रुग्णालयाकडे पाठविले जात असलेतरी अनेक रुग्ण तिथपर्यंत पोहचत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. दरकरारावर इन्हेलरही नाहीअस्थमा रुग्णांसाठी आवश्यक ‘एमडीआय’ किंवा ‘डीपीआय’ हे इन्हेलर मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दरकरारावर (आरसी) या औषधाची नोंदच नाही. यामुळे स्थानिक पातळीवर अत्यंत कमी प्रमाणात हे औषध खरेदी केले जाते. याचा फायदा १० टक्केही लोकांना होत नसल्याची माहिती आहे. बीपीएल व ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध देण्याचा नियम असताना डॉक्टर इन्हेलर बाहेरून विकत घेण्यासाठी लिहून देतात.दुरुस्तीच्या नावाखाली रुग्ण वाऱ्यावरया विभागाला ४२ व ४३ असे दोन वॉर्ड आहेत. परंतु दरम्यानच्या काळात मनुष्यबळ नसल्याचे कारणावरून तीन वर्षांपूर्वी वॉर्ड ४३ बंद करण्यात आला तर दुरुस्तीच्या नावाखाली आठ महिन्यांपूर्वी वॉर्ड ४२ बंद करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, क्षयरोग विभागाच्या परिसरात ‘एम्स’ स्थापन करण्याची घोषणा झाल्याने या विभागाकडे मेडिकल प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचेही (डीएमईआर) दुर्लक्ष झाले आहे.