शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय उपकरणांची निर्मिती देशातच व्हावी

By admin | Updated: May 26, 2017 03:51 IST

स्टार्टअप कंपन्यांनी वैद्यकीय उपकरणे आपल्याच देशात बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्टार्टअप कंपन्यांनी वैद्यकीय उपकरणे आपल्याच देशात बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आरोग्य सेवा गरिबांना परवडतील इतक्या स्वस्त करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.टाटा मेमोरिअल सेंटरच्या सेवा कार्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला. त्या वेळी त्यांनी सांगितले की, दरवर्षी १0 लाख लोकांना कर्करोग होतो. ६.५ लाख लोक या आजाराने मृत्यू पावतात. ३0 वर्षांत हा आकडा दुप्पट होईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने व्यक्त केली आहे.मोदी म्हणाले की, रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी ७0 टक्के उपकरणे विदेशातून आयात करण्यात येतात. त्यामुळे उपचाराचा खर्च वाढतो. ही परिस्थिती बदलायला हवी. वैद्यकीय उपकरणे भारतातच कशी बनवता येऊ शकतील यावर संशोधन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन मी स्टार्टअप उद्योगास करतो. तब्बल १५ वर्षांनंतर नवे राष्ट्रीय आरोग्य धोरण आम्ही घेऊन आलो आहोत. आरोग्य व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे. २0१४ मध्ये माझे सरकार सत्तेवर आले तेव्हा कॅन्सर ग्रीडला केवळ ३६ कर्करोग रुग्णालये जोडलेली होती. गेल्या तीन वर्षांत हा आकडा १0८ वर गेला आहे. टाटा मेमोरिअल सेंटरच्या मदतीने वाराणसी, चंदिगढ, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी येथे चार कर्करोग संशोधन संस्था उभ्या केल्या जात आहेत, असेही मोदींनी सांगितले.