शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात : सतेज पाटील

By admin | Updated: May 5, 2016 20:56 IST

दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही.

ऑनलाइन लोकमतसांगोला, दि. ५ : दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. आम्ही बोललो म्हणजे राजकीय विरोधक भांडवल करताहेत म्हणून आमच्यावर आरोप केले जातात. परंतु आता सगळेच बोलायला लागल्यानंतर तरी किमान सरकारला जाग यावी आणि दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी इच्छा माजी गृहराज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.सांगोला तालुक्यातील हातीद, वाटंबरे व वाढेगाव येथे भेट देवून आमदार सतेज पाटील यांनी दुष्काळाची दाहकता समजावून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. सांगोला येथे युवक काँग्रेसच्या कार्यालयात आ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, जगदीश बाबर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय टापरे, शहराध्यक्ष अजयसिंंह इंगवले, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माढा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रमसिंंह भोसले, माण तालुकाध्यक्ष विशाल बागल, माढा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाघ, करमाळ्याचे चिंंतामणी जगताप, मंगळवेढ्याचे ऋतुराज बिले, महिला जिल्हाध्यक्षा साधना उगले उपस्थित होत्या.आ. सतेज पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही दुष्काळी भागाचा दोन दिवसांचा दौरा करत आहोत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. लोक टँकर मागत आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. टँकर मंजूरीचे अधिकार तहसीलदारांना असतानाही ते मंजूर केले जात नाहीत. डाळींबाच्या बागा काढा, जनावरे विका असे सल्ले सध्या सरकारी अधिकारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी आपणास सांगितले. याबाबत आपण आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार आहोत. त्यानंतर दुष्काळासंदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. तात्पुरत्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन उपाययोजना काय -काय कराव्या लागतील ते पहावे लागणार आहे.टेंभू योजनेची रखडलेली कामे पूर्ण झाली तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. त्यासाठीही आपण अहवालात कळवणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, बागा जगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.