शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांचा दुहेरी वातावरणाशी सामना

By admin | Updated: February 2, 2015 04:55 IST

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी-अधिक होत असतानाच मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी-अधिक होत असतानाच मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत. वातावरणातील बदलामुळे मुंबईत दिवसा ऊन तर, रात्री सुटणाऱ्या गार वाऱ्यामुळे बोचरी थंडी पडत आहे. अशा दुहेरी वातावरणाचा मुंबईकरांना सध्या सामना करावा लागत आहे.राज्यात थंड लाटेचा काहीसा प्रभाव असल्याने मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट होती तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात पुढील २४ तासांत दिवसा आणि रात्रीच्या किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले आहे.मुंबईत दोन दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे. कमाल तापमान ३३ तर, किमान २१ अंशावर पोहोचले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल तापमान २७ व किमान तापमान १५ अंश एवढे नोंद होत होते. परंतु तीन ते चार दिवसांत झालेल्या वातावरणातील बदलांमुळे दिवसा व रात्रीच्या हवेतील फरकामुळे मुंबईकरांना दुहेरी वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. पुढील ४८ तासांत मुंबईत असेच हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)