सरत्या वर्षाच्या रात्री मराठवाडा, खान्देश गारठणार; हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 16:57 IST2018-12-31T16:56:00+5:302018-12-31T16:57:51+5:30
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यातील तरुणाई मोठी तयारी करत आहे.

सरत्या वर्षाच्या रात्री मराठवाडा, खान्देश गारठणार; हवामान खात्याचा इशारा
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यातील तरुणाई मोठी तयारी करत आहे. मात्र, मराठवाडा आणि खान्देशामध्ये तीव्र थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेने दिला आहे.
आज रात्री मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि औरंगाबादमध्ये तीव्र थंडीचा इशारा देण्य़ात आला असून खान्देशातील जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर नववर्षाच्या पहिल्या दोन दिवशी जळगाव आणि अहमदनगरमध्य़े तीव्र थंडी पडण्याची शक्यता आहे.