ठाकरे बंधूंबाबत अपशब्द; मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 08:43 IST2026-01-31T08:41:13+5:302026-01-31T08:43:02+5:30

Nalasopara Crime News: ठाकरे बंधूंबाबत समाज माध्यमावर अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत धिंड काढली. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. 

Marathi youth beaten up for abusive language towards Thackeray brothers | ठाकरे बंधूंबाबत अपशब्द; मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी तरुणाला मारहाण

ठाकरे बंधूंबाबत अपशब्द; मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी तरुणाला मारहाण

नालासोपारा - ठाकरे बंधूंबाबत समाज माध्यमावर अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत धिंड काढली. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.

आचोळे परिसरात राहणारा सुरज राजेशिर्के काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत रिल्स बनवत होता. त्यात त्याने ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरले होते. हा सुरज कुठे राहतो ते समजत नव्हते. कार्यकर्ते त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुरुवारी त्याचा ठावठिकाणा समजला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रात्री त्याच्या घरी गेले आणि घरातून त्याला मारहाण करत बाहेर काढले. त्याची अर्धनग्न धिंड काढत तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले. आपल्या कृत्याबाबत या तरुणाने माफी मागितली. त्याला मारहाण करताना आणि माफी मागतानाची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल केली आहे.

संबंधितास आम्ही तुळींज पोलिस ठाण्यात दिल्याचे उद्धवसेनेचे युवानेते रोहन चव्हाण यांनी सांगितले. तो दुर्दैवाने मराठीच आहे. उद्धवसेना, मनसेचा पराभव अशाच मराठी माणसांमुळे होतो म्हणून त्याचा पाहुणचार केला, असे मनसेचे किरण नकाशे यांनी सांगितले. मनसे व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मला व  वडिलांना मारहाण केली आणि माझ्या भावाला मारत घेऊन गेले. आमच्या घराची त्यांनी तोडफोड केली, असे साधना राजेशिर्के हिने सांगितले.

Web Title : ठाकरे बंधुओं पर अभद्र टिप्पणी: मनसे, उद्धव सेना कार्यकर्ताओं ने मराठी युवक को पीटा

Web Summary : नालासोपारा में ठाकरे बंधुओं पर सोशल मीडिया पर अभद्र टिप्पणी करने पर मनसे और उद्धव सेना के कार्यकर्ताओं ने एक मराठी युवक की पिटाई की और उसे घुमाया। कार्यकर्ताओं ने उसे उसके घर से निकाला और पुलिस को सौंप दिया।

Web Title : Thackeray Brothers' Abusive Remarks: MNS, Uddhav Sena Beat Marathi Youth

Web Summary : A Marathi youth was thrashed and paraded by MNS and Uddhav Sena activists in Nalasopara for making abusive remarks about the Thackeray brothers on social media. The activists took him from his home and handed him over to the police.