- नामदेव मोरे
नवी मुंबई - मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे सव्वासहा वाजता मुंबईत दाखल झाले. वाशी टोल नाक्यावर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, लढेंगे, जितेंगे हम सब जरांगे च्या घोषणांनी टोलनाका परिसर दणाणून गेला होता.
आरक्षणाच्या निकराच्या लढाईसाठी २८ ऑगस्ट ला दुपारपासून आंदोलक मुंबई, नवी मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली होती. नवी मुंबईतील बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालयासह जागा मिळेल तेथे आंदोलकांनी मुक्काम केला होता. मध्यरात्री चाकणवरून मनोज जरांगे पाटील याचा ताफा निघाल्यानंतर प्रत्येक टप्यावर सकल मराठा समाजाकडून स्वागत केले जात होते.
नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर सकाळी सव्वासहा वाजता आंदोलक दाखल झाले. येथे घोषणांनी स्वागत करण्यात आले. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. वाशी टोलनाका ते वाशी प्लाझा पर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग, घोषणा देत टोल नाका ओलांडला