मराठा आरक्षण आंदोलन : मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजपा मंत्र्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 13:57 IST2018-07-26T13:55:58+5:302018-07-26T13:57:37+5:30
मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन : मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजपा मंत्र्यांची बैठक
मुंबई - राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन पेटल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज रात्री 9 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 58 मुक मोर्चे काढल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न पुढे सरकला नाही. त्यातच मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारकडून चालढकल करण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली. त्यातून मराठा क्रांती ठोक मोर्चांना सुरुवात झाली आणि राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. यामुळे चिंतीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील भाजपा मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री सरकारमधील मराठा मंत्र्यांचे मत जाणून घेणार आहेत.