मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 10:04 AM2023-09-06T10:04:55+5:302023-09-06T10:06:08+5:30

शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली होती.

Maratha reservation agitation Jalana! Manoj Jarange Patil's health update; Started treatment with saline | मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू

मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू

googlenewsNext

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यातील वातावरण तापले होते. काल मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या शिष्टमंडळाला आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांनी चार दिवसांची मुदत दिली आहे. जरांगे उपोषणावर ठाम असून चार दिवसांत  जीआर न निघाल्यास  पाण्याचाही त्याग करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते. आता जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. 

शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली होती. आता जरांगे यांची हेल्थ अपडेट आली आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. तसेच बोलण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपोषणस्थळी जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. यामुळे गावात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी जरांगे यांची अचानक भेट घेतली आणि विचारपूस केली. आंदोलकांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Maratha reservation agitation Jalana! Manoj Jarange Patil's health update; Started treatment with saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.