पुन्हा घोंघावणार मराठा वादळ, 26 नोव्हेंबरला विधिमंडळावर धडकणार मराठा संवाद यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:32 IST2018-10-31T17:31:48+5:302018-10-31T17:32:14+5:30

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा माराठा वादळ घोंघावणार आहे.

Maratha Kranti Morcha : Maratha Samwad Yatra Start from 16 November | पुन्हा घोंघावणार मराठा वादळ, 26 नोव्हेंबरला विधिमंडळावर धडकणार मराठा संवाद यात्रा

पुन्हा घोंघावणार मराठा वादळ, 26 नोव्हेंबरला विधिमंडळावर धडकणार मराठा संवाद यात्रा

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा माराठा वादळ घोंघावणार आहे. दिवाळीनंतर 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. ही मराठा संवाद यात्रा 26 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडकणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या बुधवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच या यात्रेच्या अखेरीस विधिमंडळावर धडक देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर मराठा समाजाकडून गावागावात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा या नावाने कुणालाही पक्ष स्थापन करू देणार नाही, अशी घोषणाही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली.

Web Title: Maratha Kranti Morcha : Maratha Samwad Yatra Start from 16 November