संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:14 IST2018-05-02T14:14:12+5:302018-05-02T14:14:12+5:30
मंत्रालयासमोर आत्मदहनाच्या प्रयत्नाचा पुन्हा एकदा प्रकार घडला आहे.

संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई - मंत्रालयासमोर आत्मदहनाच्या प्रयत्नाचा पुन्हा एकदा प्रकार घडला आहे. संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो रिब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताना त्याला ताब्यात घेतले आहे.