जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीती महायुतीचा दणदणीत विजय;भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 01:14 IST2026-02-10T01:14:13+5:302026-02-10T01:14:55+5:30

"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळेच हा विजय महायुतीला मिळाला आहे," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

Mahayuti's resounding victory in the Zilla Parishad and Panchayat Samiti elections; What did BJP state president Ravindra Chavan say? | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीती महायुतीचा दणदणीत विजय;भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीती महायुतीचा दणदणीत विजय;भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. निवडणुकीचे निकाल येत असताना, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळेच हा विजय महायुतीला मिळाला आहे," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. ते मुंबईत माध्यममांसोबत बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, "आज जिल्हापरिषदेचा निवडणूक निकाल जाहीर झाला. खरेतर, या निवडणुकीच्य मध्यान्नकाळातच महायुतीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजित दादा यांचे अपघाती निधन झाले आणि आम्हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी ही एक धक्कादायक अशी घटना होती. आपण नेहमी बघतो, निवडणूका मोठ्या असोत की छोट्या, कार्यकर्त्यांचा आणि पक्षाच्या विचारधारेचा विजय व्हावा, यासाठी देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात. मात्र, अजित दादांच्या घटनेनंतर, त्यांनी आम्हा पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांना, या निवडणुकांमध्ये आपण मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाहीत अथवा कोणत्याही मिरवणूकांचा जल्लोष करायचा नाही. कार्यकर्ता बूथवर ज्या पद्धतीने काम करतो, त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढायच्या, असे सांगितले होते."

"देवेंद्रजीं, आदरणीय एकनाथराव शिंदे आणि दिवंगत नेते अजित दादा यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम झाले, त्यामुळे या बारा जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत, बाराच्या बाराही ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असे चित्र आहे. एकशे पंचवीस पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत, त्यामध्येसुद्धा भारतीय जनता पक्ष पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल. या सर्व भागांमध्ये महायुतीचे जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी निवडून येताना दिसत आहेत. खरंतर हा विजय म्हणजे जनतेने दिलेला कौल आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं मी महायुतीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो," असेही रविंद्र चव्हाण यावेली म्हणाले.


 

Web Title : जिला परिषद चुनाव में महायुति की शानदार जीत: भाजपा अध्यक्ष का भाषण

Web Summary : महायुति ने पीएम मोदी के काम के कारण जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में शानदार जीत हासिल की। भाजपा ज्यादातर जगहों पर सत्ता स्थापित करेगी। यह जीत महायुति के नेतृत्व और पिछले तीन वर्षों में विकास कार्यों में जनता के विश्वास को दर्शाती है।

Web Title : Grand Victory for Mahayuti in Zilla Parishad Elections: BJP President Speaks

Web Summary : Mahayuti secured a resounding victory in Zilla Parishad and Panchayat Samiti elections due to PM Modi's work. BJP will establish power in most places. The win reflects public trust in Mahayuti's leadership and development initiatives over the past three years.