शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

झुंज अटीतटीची! मराठवाड्यात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 10:51 IST

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. त्यातच मनसे, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी या छोट्या पक्षांसह शेकडो अपक्ष रिंगणात उतरल्याने विधानसभा निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. मात्र अद्याप राज्यातील निवडणुकीचा कल दर्शवणारे आकडे आपसे समोर आले नव्हते. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला मतदान झाल्यास त्यामध्ये महायुती बाजी मारू शकते. महायुतीला महाराष्ट्रामध्ये १४५ ते १६५ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागण्याची शक्यता ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात १०६ ते १२६ जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीली ४७ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मतं मिळलीत. इतर छोट्या पक्षांना १२ टक्के मतं मिळू शकतात. मात्र महाराष्ट्रातील सर्व छोटे पक्ष आणि अपक्षांना केवळ ५ च्या आसपास जागा मिळतील, असाही दावा या सर्व्हेमध्ये केला आहे. 

या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा विभागवार अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार  पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ३१ ते ३८ जागा, तर महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागा मिळू शकतात. विदर्भात महायुतीला ३२ ते ३७ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला २१ ते २६ जागांवर समाधान मानावं लाहू शकतं मराठवाड्यात महायुतीला १८ ते २४ जागा, तर महाविकास आघाडीला २० ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. कोकणात महायुतीला २३ ते २५ तर महाविकास आघाडीला १० ते ११ जागा मिळू शकतात. मुंबईत महायुतीला २१ ते २६ आणि महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रात १४ ते १६ जागांवर महायुती विजयी होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात, असे या पोलमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना