शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"महायुती सरकार पळपुटे, अडचणीत येईल म्हणून अधिवेशन गुंडाळून पळ काढतंय"; विरोधकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:49 IST

Mill Workers News: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहण्याचा व्यक्त केला निर्धार

गिरणी कामगारांच्या वतीने आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे आझाद मैदानात उपस्थित राहिले. या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

"मुंबईत जवळपास ७६ एकर जागा उपलब्ध आहे. मात्र सरकार गिरणी कामगारांना मुंबईतून विस्थापित करून दूर शेलू आणि वांगणीला पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरणी कामगारांना हे मान्य नाही. त्यामुळे त्यांचा गोष्टीला प्रचंड विरोध आहे. सरकार यावर तोडगा काढत तर नाहीच. उलट शेलू, वांगणीला घर नाकारल्यास कामगारांना घरांचा हक्क राहणार नाही असं म्हणत आहेत. त्यामुळे हे पळपुटे सरकार आहे. अडचणीत येईल म्हणून अधिवेशनही गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे," अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडेल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर संभ्रमावस्था आहे. त्या लोकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या १४ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून लाँग मार्च काढला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या सहयोगाने गृहनिर्माण योजना लागू केली होती. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र